नवी दिल्ली - मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आज पदाचा राजीनामा दिला. यानंतर काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी त्यावर टीकात्मक सवाल केला आहे. त्यांनी देवरांचे नाव न घेता 'हा राजीनामा आहे की, वरच्या पातळीवर जाण्याची शिडी?,' असा सवाल केला आहे. त्याच वेळी 'अशा कर्मठ लोकांपासून पक्षाने सावध राहायला हवे,' असेही त्यांनी म्हटले आहे.
‘हा राजीनामा आहे की, वरच्या पदावर जाण्याची शिडी?’
राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकांआधी नुकतीच मिलिंद देवरा यांना संजय निरूपम यांच्या जागी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी संधी दिली होती. मात्र आता राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या तीन महिने आधीच त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राष्ट्रीय पातळीवरील पद मागितले असल्याचे निरुपम यांनी ट्विटमधून अप्रत्यक्षपणे सुचवले आहे.
देवरा यांना राजीनामा दिल्यानंतर वरिष्ठ पातळीवरील पक्षाची जबाबदारी मिळणे शक्य आहे. या पार्श्वभूमीवर 'राजीनाम्यात त्यागाची भावना असते. मात्र, इथे तर दुसऱ्याच क्षणी राष्ट्रीय पातळीवरील पद मागितले जात आहे. हा राजीनामा आहे की वरच्या पातळीवर जाण्याची शिडी? अशा कर्मठ लोकांपासून पक्षाने सावध राहायला हवे,' असे ट्विट संजय निरूपम यांनी केले आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर देवरा राष्ट्रीय पातळीवरील अधिक मोठे पद मागत असल्याचे सुचवले आहे.