ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याबाबत ईटीव्ही भारतने, माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या मुलाखतीतले हे काही महत्त्वाचे मुद्दे...
प्रश्न - अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतभेटीवर उत्साहात फसफसून बोलत आहे. मोदी सरकार तर या दौऱ्यातून भारताला खूप मोठा परकीय चलनाचा लाभ होईल, असा दावा करत आहे. तुम्ही या भेटीच्या परिणामाचे मूल्यांकन कसे करता?
खुर्शिद- या भेटीत खुश होऊन टाळ्या वाजवण्यासारखे काहीच नाही, केवळ पोकळ डौल आहे आणि खूपसा पैसा खर्च करणे आहे आणि त्याला उगीचच रंग दिला जात आहे. सर्वोच्च परदेशी नेता भेटीला येतो, आणि मैत्रीपूर्ण वागतो, जसे ट्रम्प वागले. हे एखाद्या राष्ट्र्राचा अहंकार सुखावण्यासाठी चांगले आहे. पण शेवटी, जेव्हा हे सर्व काही संपते आणि तुम्ही बसून जमेच्या बाजूचा विचार करता तेव्हा तुम्हाला काय हवे होते आणि तुम्हाला काय मिळाले, याचा विचार करता तेव्हा काहीच नाही, असे लक्षात येते. मला वाटते त्यात दाखवण्यासारखे काहीही नाही. मला वाटते की हे सरकार पोकळ भासणाऱ्या गोष्टींमध्येच आनंद मानणारे आहे. अशा गोष्टी की ज्या खूप मोठ्या आवाजाच्या वाटतात पण आत काहीच नसते. या शब्दात मी या भेटीचे वर्णन करेन. ट्रम्प यांच्यासाठी मात्र ही भेट चांगली होती.
प्रश्न - अध्यक्ष ट्रम्प यांची भारतभेट आगामी अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीबाबत होती का? काही लोक असे म्हणतात की, ट्रम्प यांना स्वतःच्या निवडणुकीची काळजी होती. तुमची टिप्पणी?
खुर्शिद - अर्थात. त्यांना तशी काळजी आहे कारण त्यांच्याकडे सहा महिन्यांचा कालावधी आहे. त्यांना निवडणुकीची चिंता वाटत आहेच. राष्ट्रे व्यक्तींशी जोडलेली नसतात, तर लोकांशी जोडलेली असतात आणि मला आशा आहे की, अमेरिकन लोकांशी आमचे तसे संबंध आहेत. पूर्वी आम्हाला अमेरिकेबरोबर काही समस्या होत्या. जगाच्या काही दृष्टिकोनांशी आणि त्याच्या काही धोरणांशी आम्ही सहमत झालो नव्हतो. यामुळेच जगातील दोन महान लोकशाही देशांमध्ये परकेपणा आला होता. पण जर आमचे त्यांच्याशी चांगले संबंध असतील तर कुणीही तक्रार करू शकत नाही, आम्हाला तितके पुरेसे आहे. पण या जवळकीच्या संबंधांनी आमच्यासाठी काय आणले, हा मोठा प्रश्न आहे. मला त्यातून फार काही मिळेल, असे वाटत नाही.
प्रश्न - चीन, यूके, ऑस्ट्रेलिया, इस्रायल यांच्याशी भारताच्या संबंधांच्या संदर्भात, पंतप्रधान मोदी यांची प्रबळ नेता म्हणून असलेली प्रतिमा आमचे जागतिक स्थान उंचावण्यासाठी मदत करत आहे का?
खुर्शिद - तसे घडत आहे का? आमच्याशी कोणी चर्चा करत आहे का? जेरूसलेमबाबत काय करायचे ते ठरवण्याआधी आम्ही भारताशी चर्चा करू, असे कुणी म्हणत आहे का? हेच अमेरिकन अध्यक्ष जेरूसलेमबाबत काय भूमिका घ्यायची याबद्द्ल आमचा सल्ला घेत आहे का? चीनने रस्ता बांधायचा निर्णय घेतला तेव्हा काय करायचे, यावर त्यांनी फोनवर आपल्याशी चर्चा केली का? पाकिस्तान मित्र आहे, असे म्हणण्यापूर्वी त्यांनी आमच्याशी बोलणी केली होती का?आम्हाला जो लाभ देण्याचे आणि गुंतवणूक करण्याचे वचन दिले होते, ते कुठे आहे? आम्हाला काही लाभ झाला आहे, याबद्दल माझी मुळीच खात्री नाही. चीनसोबत आम्ही जी वर्तणूक करत आहोत, त्यामुळे चीनी आणि जपानी सुखी आहेत का? लोकांनी भारताला पाठिंबा देणे ही चांगली गोष्ट आहे पण गेल्या ४ ते ५ वर्षांत ते घडलेले नाही. ही मोठी कहाणी आहे आणि खूप काही घडून गेले आहे. जेव्हा आम्ही अध्यक्ष ट्रम्प आणि मोदी यांच्यातील संबंध किती स्नेहाचे आहेत, याचा डांगोरा पिटू, तेव्हा आम्ही अमेरिकन अध्यक्ष जॉन केनेडी पंडित नेहरू यांच्याबरोबर चालले होते, ते दिवस विसरता कामा नये. जॅकलिन केनेडी यांना भारतात खास पाठवण्यात आले होते, हे आम्ही विसरता कामा नये. या देशात असे खूप काही घडून गेले आहे, जे मोदी यांना माहित नाही, असे दिसते आहे.
प्रश्न - गेल्या काही वर्षांत भारताची प्रतिमा कमालीची बदलली आहे का?
खुर्शिद - भारताचे स्थान नेहमीच उच्च राहिले आहे. हे विसरू नका की भारत हा अलिप्त राष्ट्र चळवळीत आघाडीवर होता. युगोस्लाव्हिया, इजिप्त आणि भारत हे तीन देश होते. ब्रिक्सचे आघाडीचे सदस्य आम्ही झालो तेव्हाही आमचे स्थान उच्चच होते आणि सार्क प्रदेशात सर्वात ज्येष्ठ आणि सर्वात महत्वाचा देश झालो. एसियान आणि आशिया पॅसिफिकमध्ये आमची चळवळ मोदी यांच्या कितीतरी आधी घडली आहे. त्यामुळे त्यांनी काहीच गमावलेले नाही, की त्यासाठी त्यांचे आम्ही अभिनंदन करावे. पण अध्यक्ष ट्रम्प येथे असताना दिल्लीत आणि इतरत्र काय घडत होते, मला आशा आहे की आमच्या प्रतिमेचे नुकसान झालेले नसावे.
प्रश्न - गमतीची गोष्ट आहे की, अध्यक्ष ट्रम्प यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली तेव्हा, त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले पण महात्मा गांधी यांचा उल्लेखही केला नाही. तुमची प्रतिक्रिया काय आहे?