बरेली -उत्तरप्रदेशच्या बरेली येथील साक्षी व अजितेश यांचे प्रेमविवाह प्रकरण दररोज नव-नविन वळण घेत आहे. 'ई टिव्ही'वर बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर साक्षी आणि तिच्या सासरच्या लोकांना शोधून त्यांना सुरक्षा देण्याकरिता नोएडा पोलीस निघाले आहेत. या पथकात एक पोलीस उपनिरीक्षक, एक महिला शिपाई व एक पुरुष शिपाई अशा तिघांचा समावेश आहे.
साक्षी व तिच्या सासरच्यांचा फोन, पत्ता याबाबत अजूनही कुणालाच स्पष्ट माहिती नाही. तसेच माध्यमांमध्ये वारंवार येणाऱ्या बातम्यांमुळे त्यांना सुरक्षा देण्याच्या दृष्टिने पोलिसांचे हे पथक रवाना झाले आहे. हे पथक त्यांना नोएडा येथील फिल्म सिटीच्या सेक्टर १६ मध्ये शोध घेण्यासाठी निघाले आहे. सोशल मिडीयावरही साक्षी-अजितेश आणि त्यांच्या घरचे हे सतत आमदार राजेश मिश्रा यांचेवर आरोप करत आहेत. सध्या सोशल मीडियावर या प्रकरणाला उधाण आले असून लोकं आमदाराची बाजू मांडत या जोडप्याला चांगलेच ट्रोल करत आहे.
सोशल मीडियावर अजितेशच्या साक्षगंधापासून तर नशा करतानाचे व्हिडीओ वायरल होत असल्यामुळे लोक त्यांची निंदा करत आहेत. इतकेच नव्हे तर अजितेशच्या शेजाऱ्यांपासून तर त्याच्या मित्रांपर्यंत सर्वांनीच त्याच्याविषयी विविध माहिती सांगितली आहे.