महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मारहाणीचे लोण सुरुच; दरोडेखोरांनी साधूला लुटून केली मारहाण

पालघरमध्ये दोन संतांना मारहाण करुन ठार केल्याने देशभर संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर संतांना मारहाण केल्याचे लोण आता पंजाबमध्येही पसरले आहे.

Sant
मारहाणीत जखमी संत

By

Published : Apr 25, 2020, 1:27 PM IST

होशीयारपूर- महाराष्ट्रातील पालघरमध्ये दोन संतांना मारहाण करुन ठार केल्याने देशभर संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर संतांना मारहाण केल्याचे लोण आता पंजाबमध्येही पसरले आहे. पंजाबमधील होशीयारपूर येथे दरोडेखोरांनी साधूला लुटून मारहाण केल्याने खळबळ उडाली आहे.

होशीयारपूर येथे दुचाकीवर आलेल्या दरोडेखोरांनी साधूला मारहाण केली. यानंतर साधूकडील सामान लुटत त्यांनी दुचाकीवरुन पोबारा केला. या मारहाणीत साधूच्या चेहऱ्यासह डोक्याला दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत संशयित आरोपींचा शोध सुरू केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details