पणजी - मुलांमधील बुद्धिमत्ता शोधून योग्यवेळी योग्यसंधी दिली पाहिजे. देशातील पालकांचा कल आता बदलत असून खूल्या मनाने विविध क्षेत्रे स्वीकारली जात आहेत. त्यामुळे मुले भविष्यात यशस्वी होऊ शकतात, असे मत प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी आज केपे येथे केले.
मुलांची आवड वेळीच लक्षात घेऊन त्यांना संधी दिली पाहिजे - सचिन तेंडुलकर - apollo
दक्षिण गोव्यातील केपे येथे तेंडुलकर यांच्या उपस्थितीत अपोलो टायर्सच्यावतीने ऑफरोड रायडिंग इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. यावेळी तेंडुलकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
दक्षिण गोव्यातील केपे येथे तेंडुलकर यांच्या उपस्थितीत अपोलो टायर्सच्यावतीने ऑफरोड रायडिंग इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. यावेळी कंपनीने अध्यक्ष ओंकार कंवर, व्यवस्थापकीय संचालक नीरज कंवर आणि सतीश शर्मा उपस्थित होते. यावेळी तेंडुलकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विदेशात अशा खडतर रस्त्यावर गाडी चालवण्याचा अनुभव घेतला आहे. मात्र, या इव्हेंटच्या माध्यमातून पहिल्यांदाच देशात हा अनुभव घेतला. हा एक वेगळ्या प्रकारचा अनुभव होता. अशा प्रकारची स्पर्धा किमान दोन-तीन महिन्यात एकदा झाली पाहिजे, असेही सचिनने यावेळी सांगितले.
तेंडुलकर यांनी खोल दगडी खाणीत तयार करण्यात आलेल्या ट्रॅकवर ऑफ रोडर्स बनून सहभाग घेतला. सुमारे १०० फुट खोल आणि अस्ताव्यस्त पसरलेल्या या जागेत सरळ भिंत चढण्याबरोबर तीव्र आणि खडतरीत दरीत गाडी उतरून बाहेर काढण्यात आली. यामध्ये देशाच्या विविध भागांतील ५० ऑफरोडर्स कम्युनिटींनी सहभाग घेतला.