महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ये दोस्ती हम नहीं छोडेंगे : सिंधिया आणि पायलट यांची ग्वाल्हेरमध्ये भेट - ज्योतिरादित्य सिंधियांची सचिन पायलटशी भेट न्यूज

विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सचिन पायलट मध्य प्रदेशच्या प्रचार दौऱ्यावर आले आहेत. तेव्हा भाजपा खासदार ज्योतिरादित्य सिंधिया आणि राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची ग्वाल्हेरमध्ये भेट झाली. याची माहिती खुद्द सिंधिया यांनी दिली.

sachin-pilot-meets-jyotiraditya-scindia-in-gwalior
ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे: सिंधिया आणि पायलट यांची ग्वालियरमध्ये भेट

By

Published : Oct 28, 2020, 1:19 PM IST

Updated : Oct 28, 2020, 5:00 PM IST

ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) -भाजपा खासदार ज्योतिरादित्य सिंधिया आणि राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची ग्वाल्हेरमध्ये भेट झाली. याची माहिती खुद्द सिंधिया यांनी दिली. त्यांनी सांगितलं की, माझे पूर्वीचे सहकारी आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सचिन पायलट यांची ग्वाल्हेरमध्ये भेट झाली.

विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सचिन पायलट मध्य प्रदेशच्या प्रचार दौऱ्यावर आले आहेत. ते सिंधिया यांचे वर्चस्व असलेल्या विधानसभा मतदारसंघात ९ सभा घेणार आहेत. मध्य प्रदेश काँग्रेसचे स्टार प्रचारक असलेले पायलट पहिल्यादांच सिंधिया यांच्याविरोधात सभा घेणार आहेत.

सिंधिया यांनी पायलटला म्हटलं, 'ऑल द बेस्ट'..

सिंधिया आणि सचिन पायलट यांची भेट ग्वाल्हेर विमानतळावर झाली. या भेटीत सिंधिया यांनी सचिन पायलट यांना 'ऑल द बेस्ट' म्हटल्याची माहिती मिळत आहे. भेटीनंतर सिंधिया भोपाळसाठी रवाना झाले. तर, पायलट ग्वाल्हेरमध्ये दाखल झाले.

प्रचारादरम्यान, दोघांनी एकमेकांचे नाव घेणे टाळले..

सिंधिया यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला. यानंतर दोघांची विचारसरणी बदलली. सचिन पायलट यांची भाषण शैली युवकांना आकर्षित करणारी आहे. यामुळे काँग्रेसने त्यांना सिंधिया यांच्या गडामध्ये प्रचारासाठी उतरवले आहे. पायलट 31 ऑक्टोबरला प्रचार सभेला संबोधित करणार आहेत. सद्या भाजपा आणि काँग्रेस नेते एकमेकांवर शेलक्या शब्दांत टीका करत आहे. असे असले तरी, सिंधिया आणि पायलट यांनी एकमेकांचे नाव घेणं अद्याप टाळले आहे.

हेही वाचा -'पैसा हजम परियोजना खतम, हाच विरोधकांचा मंत्र', प्रचार सभेत मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

हेही वाचा -शेतकरी आणि बेरोजगारांच्या न्यायासाठी महाआघाडीला मतदान करा : राहुल गांधींचे आवाहन

Last Updated : Oct 28, 2020, 5:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details