नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे पक्षाकडून नवीन अध्यक्षपदाची शोध मोहीम सुरु आहे. यातच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी अध्यक्षपदासाठी सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य सिंधिया या दोघांची नावे सुचवली आहेत.
पंजाबचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या अध्यक्ष हा उर्जावान असावा या मताशी मी सहमत आहे. काँग्रेसचा नवा अध्यक्ष हा तरुण आणि सक्षम असावा. त्याला निवडणुकीचं राजकारण, प्रशासन आणि पक्ष संघटनेच्या कामाचा अनुभव असावा. हे सर्व गुण सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य सिंधिया या दोघांकडे असून ते काँग्रेसच्या संघटनेला बळ देऊ शकतात, असे मत मिलिंद देवरा यांनी व्यक्त केले आहे.