राहुल गांधीच्या 'त्या' वक्तव्यावरून लोकसभेत गदारोळ; धक्काबुक्कीनंतर कामकाज स्थगित - lokssbha specch harshwardhan
भाजप आणि काँग्रेस सदस्यांमधील वाद एवढा वाढला की प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत आले. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज स्थगित केले.
नवी दिल्ली -राहुल गांधीनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या वक्तव्यानंतर आज(शुक्रवार) लोकसभेत गदारोळ झाला. भाजप आणि काँग्रेस सदस्यांमधील वाद एवढा वाढला की प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत आले. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज स्थगित केले.
एका प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी राहुल गांधींनी मोदींबाबात केलेल्या वक्तव्याचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदींना देशातील जनता सहा महिन्यात दांडक्याने मारणार आहे, असे वक्तव्य राहुल गांधींनी केले होते. या वक्तव्याचा हर्षवर्धन यांनी निषेध केला. त्यावर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हर्षवर्धन यांना थांबवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, काँग्रेस खासदार मनिकम टागोर हर्षवर्धन यांच्या जागेवर पोहचून वाद घालू लागले. त्यानंतर इतर भाजप सदस्यही तेथे आले. मनिकम यांना पकडण्याचा प्रयत्न भाजप खासदारांनी केला. त्यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज स्थगित केले.
राहुल गांधी यांचे वडील स्वत: पंतप्रधान होते. त्यामुळे ते पंतप्रधानाबाबत, असे वक्तव्य कसे काय करू शकतात. असे म्हणत डॉ. हर्षवर्धन यांनी निषेध व्यक्त केला. भाजपने या प्रकरणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रारही दाखल केली आहे.