महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

३७० कलमाच्या मुद्द्यावर लोकांनी भाजपसोबत रहावे - मोहन भागवत - political interests

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते एस. एम. कृष्णा यांनीही अशाच प्रकारच्या भावना व्यक्त केल्या आहेत. कृष्णा यांनी नुकताच भाजप प्रवेश केला आहे. याआधी ते अनेक वर्षे काँग्रेसमध्ये होते.

मोहन भागवत

By

Published : Aug 5, 2019, 4:27 PM IST

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे ३७० कलम हटवण्यासाठी केंद्र सरकारकडून आज राज्यसभेत प्रस्ताव मांडण्यात आला. यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी प्रतिक्रिया देताना याप्रकरणी लोकांनी राजकीय जागरूकता वाढवून भाजपसोबत राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, हे पाऊल उचलल्याबद्दल सरकारचे अभिनंदनही केले आहे.

'हे पाऊल उचलल्याबद्दल आम्ही सरकारचे अभिनंदन करत आहोत. हे काऊल केवळ जम्मू काश्मीरसाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठी महत्त्वाचे होते. प्रत्येकाने राजकीय हिताच्या आणि वैचारिक भिन्नतेच्या पलीकडे जाऊन या निर्णयाला पाठिंबा देणे आवश्यक आहे,' असे भागवत यांनी म्हटले आहे.

३७० कलम हटवण्यासाठी प्रयत्न करत महत्त्वाचे पाऊल उचलल्याबद्दल मोहन भागवतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारचे कौतुक केले आहे. या कलमाने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता. यामुळे केवळ जम्मू-काश्मीरच्या स्थायी नागरिकांना (तिथेच राहणारे) तेथे जमीन खरेदी करण्याचा, सरकारी नोकरी मिळवण्याचा अधिकार आहे. एवढेच नाही तर ज्या महिलेने इतर राज्यातील मुलाशी लग्न केले असेल, तर तीसुद्धा येथे जमीन खरेदी करू शकत नाही.

'या कलमामुळे जम्मू-काश्मीरला वेगळा दर्जा मिळतो, ते स्वायत्तता असलेले, भारतीय राज्य घटनेचा अगदीच नाममात्र अंमल असलेले जवळपास स्वतंत्र राष्ट्रच आहे. जम्मू काश्मीर जर भारताचा अविभाज्य भाग बनवायचा असेल तर हे कलम आणि ३५(अ) हेही कलम रद्द केले पाहिजे,' असे भाजपचे म्हणणे आहे. भाजप सरकार ही दोन्ही कलमे रद्द करण्यासाठी विधेयक आणण्याच्या तयारीत आहे.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते एस. एम. कृष्णा यांनीही अशाच प्रकारच्या भावना व्यक्त केल्या आहेत. कृष्णा यांनी नुकताच भाजप प्रवेश केला आहे. याआधी ते अनेक वर्षे काँग्रेसमध्ये होते.

ABOUT THE AUTHOR

...view details