नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे ट्विटरवर आगमन झाले आहे. त्यांनी नुकतेच स्वतःचे ट्विटर अकाऊंट सुरू केले असून अद्याप ट्विट केलेले नाही. मात्र, ट्विट करण्यापूर्वीच त्यांना २४ हजारहून अधिक फॉलोअर्स मिळाले आहेत. ते सध्या केवळ आरएसएसला फॉलो करत आहेत.
सरसंघचालक भागवतांनी उघडले ट्विटर अकाऊंट, ट्विट करण्यापूर्वीच २४ हजारहून अधिक फॉलोअर्स - rss chief mohan bhagwat
सरसंघचालकांनी नुकतेच स्वतःचे ट्विटर अकाऊंट सुरू केले असून अद्याप ट्विट केलेले नाही. मात्र, ट्विट करण्यापूर्वीच त्यांना २४ हजारहून अधिक फॉलोअर्स मिळाले आहेत. ते सध्या केवळ आरएसएसला फॉलो करत आहेत.
सरसंघचालकांचे ट्विटर हँण्डलर @DrMohanBhagwat असे आहे. त्यांचे हे ट्विटर अकाउंट मे महिन्यातच तयार झाले होते, मात्र संघाकडून अधिकृतरित्या ते आज सक्रिय करण्यात आले. त्यांच्यासह सरकार्यवाह भय्याजी जोशी, सह सरकार्यवाह सुरेश सोनी, कृष्ण गोपाल, व्ही. भागय्या, प्रचार प्रमुख अरूण कुमार आणि अनिरूद्ध देशपांडे यांनीही ट्विटरवर पदार्पण केले आहे.
सरसंघचालकांना फॉलो करणाऱ्यांमध्ये रामदेव बाबा, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आदी व्यक्तींचा समावेश आहे. तर, संघाच्या ट्विटर पेजचे १.३ दशलक्ष फॉलोअर आहेत.