नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या निविदांमध्ये चिनी कंपन्यांना सहभागी होण्यास बंदी घालण्यात यावी, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या स्वदेशी जागरण मंचने मंगळवारी केले आहे. हुतात्मा झालेल्या सैन्याच्या जवानांना श्रद्धांजली म्हणून जनतेने चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहनही मंचने केले आहे. भारत-चीनच्या सीमेवरील गलवान येथे सोमवारी रात्री दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झटापट झाली. यामध्ये भारताच्या तब्बल २० जवानांना वीरमरण आले आहे.
लोकांनी चिनी उत्पादने वापरणे बंद केली पाहिजेत. अभिनेता, क्रिकेटपटू आणि इतर सेलिब्रिटींनी चिनी उत्पादनांचा प्रचार करू नये, असे आवाहन स्वदेशी जागरण मंचचे सह-संयोजक अश्वनी महाजन यांनी केले.