महाराष्ट्र

maharashtra

रेल्वे स्टेशनवर मोबाईल चोरणाऱ्याला अटक; आरपीएफ पोलिसांची कारवाई

By

Published : Feb 5, 2019, 3:51 PM IST

रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या चोराला आरपीएफ पोलिसांनी अटक केली.

आरपीएफ

नागपूर - प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या आरोपीला आरपीएफच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. अनिल कुशवाह असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो झासी येथील राहणारा आहे. आरपीएफ पोलिसांनी त्याच्या जवळून ४ मोबाइलही जप्त केले आहेत.

आरपीएफ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगड येथील रहिवासी नरेंद्र चंद्राकर हे प्रवासाच्या निमित्ताने नागपूरच्या मुख्य रेल्वे स्थानकावर आले होते. त्यांनी आपला मोबाईल स्टेशनवर असलेल्या चार्जिंग पॉइंटला चार्जिंग करण्यासाठी लावला होता. नरेंद्र यांची नजर हटताच एका चोरट्याने त्यांचा मोबाईल पळवला. ही बाब लक्षात येतात त्यांनी तत्काळ आरपीएफ ठाण्यात चोरीची तक्रार नोंदवली. तक्रारीनुसार आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा एकाने मोबाईल चोरल्याचे यात दिसून आले.

तेव्हा प्लॅटफॉर्मवर तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना मोबाईल चोराची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच गस्तीवर असलेले सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आरोपीचा शोध सुरू केला. आरोपी नागपूर भुसावळ पॅसेंजरमध्ये गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला गाठून त्याची झडती घेतली. तेव्हा त्याच्या जवळून २१ हजार रुपये किमतीचे ४ चोरीचे मोबाईल आढळून आले. पोलिसांनी आरोपी महेश कुशवाह याला अटक केली असून त्याच्यावर पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details