महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू, 15 जखमी - यूपी पुलिस

उत्तर प्रदेशमधील हापूड जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. यामध्ये

उत्तर प्रदेशमध्ये भिषण अपघात

By

Published : Jul 22, 2019, 11:17 AM IST

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील हापूड जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ९ जणांचा मृत्यू तर 15 जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये भिषण अपघात, 9 जणांचा मृत्यू तर 15 जण जखमी


धौलाना ठाण्याच्या हद्दीतील सालेपूर गावावरून पिकअपमध्ये काही लोक लग्नावरून घरी परतत होते. यावेळी अचानक एका अज्ञात वाहनाने ओव्हरटेक करत पिकअपला जोरदार धडक दिली. यावेळी पिकअपमध्ये जवळपास 25 जण होते. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details