पाटणा -बिहारमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या झडत आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्यावर टीका केली होती. तुमच्या आई-वडिलांना विचारा, त्यांनी सत्तेत असताना कधी शाळा, कॉलेज बांधले का? असा सवाल नितीश कुमारांनी केला होता. त्यावर आरजेडीने पलटवार केला. नितिशजी आपल्या भाषेने आपण बिहारच्या राजकारणाला लज्जित करत आहात. तेजस्वी यादव यांच्याकडून काही तरी शिका, अशी खोचक टीका आरजेडीने केली.
'नितिश कुमारजी तेजस्वी यादव यांच्याकडून काही तरी शिका' आरजेडीचा पलटवार - बिहार निवडणूक अपडेट
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्यावर टीका केली होती. तुमच्या आई-वडिलांना विचारा, त्यांनी सत्तेत असताना कधी शाळा, कॉलेज बांधले का? असा सवाल नितीश कुमारांनी केला होता. त्यावर आरजेडीने पलटवार केला.
नितीश जी, आपल्या भाषेने तुम्ही बिहारच्या राजकारणाला लज्जित करत आहात. दु: ख, द्वेष, बढाईखोरपणा आणि वैरभावनेने नव्हे तर जनतेची चिंता, शिष्टाचार, सौजन्याने आणि सकारात्मक प्रतिस्पर्ध्याने राजकारण करा. तसेच तेजस्वी यादव यांच्याकडून काही तरी शिका, असे टि्वट आरजेडीने केले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यात मतदान होणार आहे. 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबरला मतदान होईल. निकाल 10 नोव्हेंबरला जाहीर होतील. या निवडणुकीत, राजद काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या साथीने लढत असून भाजप आणि जेडीयूसह इतर चार पक्ष त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरले आहेत.