नवी दिल्ली -काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात एक मादी गेंडा मृतावस्थेत आढळली आहे. शिकाऱ्याने मादी गेंड्यावर गोळी झाडून तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. या संदर्भात वन्यजीव विभागाने एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची तपासणी सुरू आहे. अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.
मादी गेंड्याची काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात हत्या - मादी गेंड्याची हत्या
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात एक मादी गेंडा मृतावस्थेत आढळली आहे. या संदर्भात विश्वनाथ वन्यजीव विभागाने एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची तपासणी सुरू आहे. अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.
मादी गेंडा
गबराई शिकारविरोधी शिबिराअंतर्गत मतेकाल बील भागात गस्त घालत असलेल्या कर्मचार्यांना मादी गेंडा मृतावस्थेत आढळली. या परिसरात त्यांना काडतुसचे सहा खोके आढळल्याचे त्यांनी सांगितले. गस्त घालणाऱ्या दलाने शिकाऱ्यांच्या पाऊलखुणांचा मागोवा घेतल्यानंतर त्यांना मादी गेंडा मृतावस्थेत सापडल्याचे त्यांनी सांगितले.