राफेलप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी - कारवाई
न्यायालयाने 14 डिसेंबरला दिलेल्या निकालाचा फेरविचार करण्यासाठी यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि प्रशांत भूषण यांनी याचिका दाखल केली होती. याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
नवी दिल्ली - राफेलप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायालयाने 14 डिसेंबरला दिलेल्या निकालाचा फेरविचार करण्यासाठी यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि प्रशांत भूषण यांनी याचिका दाखल केली होती. त्यामुळे आजच्या निकालाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सरकारने आपल्या प्रतिज्ञा पत्रात दुरुस्ती केली आहे. त्यामुळे न्यायालयाने 14 डिसेंबरला दिलेल्या निकालाचा फेरविचार करावा यासाठी यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि प्रशांत भूषण यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी राफेल प्रकरणात न्यायालयाच्या निकालानंतर काही कागदपत्रे उघडकीस आल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला. काही सरकारी कर्मचाऱ्यांनी काही माहिती दडवल्याचा संशय व्यक्त करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली.
याबाबत याचिकाकर्त्यांचा आरोप ग्राह्य धरून कारवाई केल्यास चुकीचे ठरेल, अशी भूमिका केंद्राने घेतली. केवळ काही वृत्तपत्रांतील बातम्या आणि फाईलींवरील नोंदीवरून अशी कारवाई करणे योग्य नसल्याचेही केंद्राने स्पष्ट केले. याचिकाकर्त्यांचे आरोप निराधार असून केंद्राने न्यायालयापासून काहीही लपवले नसल्याचा दावा केंद्राच्या वतीने करण्यात आला आहे. सरकारने अधिकृत माहितीच्या आधारेच न्यायालयाला माहिती दिल्याचेही केंद्राने स्पष्ट केले.