महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पीएमसी बँकेतून आता काढता येणार २५ हजार रूपये... - पीएमसी बँक घोटाळा

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या ठेवीदारांना आता आपल्या खात्यातून २५ हजार रुपयांपर्यंत रक्कम काढता येणार आहे. याआधी ही मर्यादा केवळ १० हजार रुपये होती.

Punjab and Maharashtra Cooperative Bank Ltd

By

Published : Oct 3, 2019, 11:40 PM IST

नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेने याआधी दिलेल्या निर्णयामुळे पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक लिमिटेडच्या (पीएमसी) ठेवीदारांना त्यांच्या खात्यातील एकूण शिल्लक रकमेपैकी फक्त १० हजार रुपये काढता येत होते.

दरम्यान, रिझर्व्ह बँकेने पुन्हा बँकेच्या तरलतेच्या स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर, ठेवीदारांची अडचण कमी करण्यासाठी पैसे काढण्याची मर्यादा २५ हजार रुपयांवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. या सवलतीमुळे, बँकेच्या ७० टक्क्यांहून अधिक ठेवीदारांना त्यांच्या खात्यातील संपूर्ण रक्कम काढून घेता येणार आहे.

रिझर्व्ह बँक ही पीएमसी बँकेच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहे. ठेवीदारांच्या हितासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात येतील, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : हे राम..! गांधीजयंती दिवशीच बापूंचा अस्थिकलश गेला चोरीला...

ABOUT THE AUTHOR

...view details