महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उत्तराखंडमधील हिमस्खलनात २६ जणांचा मृत्यू, १७१ अजूनही बेपत्ता - हिमकडा कोसळला बातमी

उत्तराखंडमधील चमोली येथे हिमस्खलन होऊन पुरात आत्तापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला असून १७१ जण अजूनही बेपत्ता आहेत. ITBP, NDRF, SDRF आणि उत्तराखंड पोलिसांकडून बचावकार्य सुरू आहे. उर्जा प्रकल्पाच्या बोगद्यात अडकून पडेलल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी गाळ उपसण्याचे काम सुरू आहे.

rescue operation
बोगद्यात बचावकार्य करताना जवान

By

Published : Feb 9, 2021, 7:46 AM IST

देहराडून - उत्तराखंडमधील चमोली येथे हिमस्खलन होऊन पुरात आत्तापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला असून १७१ जण अजूनही बेपत्ता आहेत. ITBP, NDRF, SDRF आणि उत्तराखंड पोलिसांकडून बचावकार्य सुरू आहे. उर्जा प्रकल्पाच्या बोगद्यात अडकून पडेलल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी गाळ उपसण्याचे काम सुरू आहे. आतमध्ये अडकलेले कामगार कोणत्या स्थितीत आहेत, याची माहिती मिळाली नाही. १०० मीटरपर्यंत बोगद्यातील गाळ बाहेर काढण्यात आला आहे.

दोन उर्जा प्रकल्पांत अडकले कामगार -

हाती आलेल्या माहितीनुसार, एनटीपीसी म्हणजेच नॅशलन थर्मल पॉवर कॉर्पोरेशनचा धौलीगंगा नदीवर तपोवन विष्णूगड जलविद्यूत प्रकल्प आहे. हा प्रकल्प निर्माणीधीन असून जलउर्जा प्रकल्प तयार करण्यासाठी बोगदा तयार करण्यात येत होता. या बोगद्यात अचानक पुराचे पाणी शिरले. या पाण्यात मोठ्या प्रमाणात दगड, माती आणि चिखल होता. त्यामुळे कामगारांना बाहेर पडता आले नाही. अनेक कामगार आत अडकले असून त्यांना वाचवण्याचे काम सुरू आहे. तर याच नदीमार्गावर ऋषीगंगा नामक दुसरा उर्जा प्रकल्प आहे. त्या ठिकाणीही अनेक कामगार आत अडकले आहेत.

दगड, माती. चिखलामुळे बचावकार्यात अडथळा -

हिमस्खलन होऊन आता ३५ तास उलटून गेले आहेत. मात्र, रात्रीचेही बचावकार्य सुरू ठेवण्यात आले आहे. बराच वेळ होऊन गेला आहे. कामगार जिवंत असण्याची शक्यता मावळत चालली आहे. आम्ही बोगद्यात आतपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, गाळ आणि चिखलामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. तपोवन येथील प्रकल्पाच्या बोगद्यात ३५ जण अडकल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. यातील अनेक कामगार खासगी कंत्राटदाराकडे काम करणारे होते, असे बचावपथकातील एका जवानाने सांगितले.

पुरात अनेक जण वाहून गेल्याची शक्यता -

१७१ जण बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. यातील अनेक जण पुरात वाहून गेल्याची माहिती मिळत आहे. किनारी भागात राहणारे काही नागरिक या आपत्तीत सापडले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details