नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने उलट्या बोंबा मारण्यास सुरुवात केली आहे. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र, तरीही पाकिस्तान भारतावरच आरोप करत आहे. पुलवामातील हल्ला म्हणजे भारतीय गुप्तचर यंत्रणा 'रॉ' ने रचलेले षड्यंत्र आहे, असे वक्तव्य पाकिस्तान पिपल्स पार्टीचे नेते रहमान मलिक यांनी केले आहे.
Pulwama Attack : पाकच्या उलट्या बोंबा; म्हणे, 'रॉ'ने घडवला हल्ला - pulwama terror attack
आंतरराष्ट्रीय न्यायालयात प्रलंबित असलेल्या कुलभूषण जाधव प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी 'रॉ' ने हा हल्ला केल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.
रहमान मलिक
आंतरराष्ट्रीय न्यायालयात प्रलंबित असलेल्या कुलभूषण जाधव प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी 'रॉ' ने हा हल्ला केल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. ‘द डॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना रहमान मलिक यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यासाठी भारतीय गुप्तचर यंत्रणेला जबाबदार ठरवले आहे.
पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात ४५ भारतीय जवानांना वीरमरण आले होते.