मुंबई- कर्नाटकात राजकीय नाटय़ सुरूच आहे. मुंबईमध्ये रेनिसन्स हॉटलमध्ये थांबलेल्या काँग्रेसच्या 10 बंडखोर आमदारांनी पोलीस सुरक्षेची मागणी केली आहे. मुंबई पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहून या बंडखोर आमदारांनी सुरक्षेची मागणी केली आहे. कर्नाटकचे सांस्कृतिक मंत्री डी.के. शिवकुमार यांच्या भेटीपूर्वी सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी या आमदारांनी केली आहे.
कर्नाटक वॉर : बंडखोर आमदारांचे मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र, सुरक्षेची मागणी
मुंबई पोलिसांना या बंडखोर आमदारांनी एक पत्र लिहले आहे.
बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी काँग्रेसने मंगळवारी विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांच्याकडे केली होती. तर सत्ताधारी पक्षांतील 13 बंडखोर आमदारांपैकी 8 जणांनी सादर केलेले राजीनामे विहित नमुन्यात नसल्याने त्यांना पुन्हा राजीनामा पत्र पाठविण्याचे निर्देश रमेशकुमार यांनी दिले. दरम्यान, बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यासाठी कॉंग्रेस नेते डी. के. शिवकुमार आज मुंबईत येणार असल्याची माहिती होती. मात्र, आम्हला त्यांना भेटायचे नाही, असे म्हणत काँग्रेस आमदारांनी सुरक्षेची मागणी केली आहे.
मुंबई पोलिसांना या बंडखोर आमदारांनी एक पत्र लिहले आहे. यामध्ये त्यांनी 'आम्ही कर्नाटकातील आमदार मुंबईतील हॉटेल रेनिसन्स पवई येथे राहात आहोत. आम्ही ऐकले आहे की, कुमारस्वामी आणि डी.के शिवकुमार हॉटेलच्या परिसरात आम्हला भेटण्यासाठी येणार आहेत. मात्र, आम्हला त्यांना भेटायचे नाही. त्यामुळे त्यांना हॉटेल परिसरात प्रवेश करण्यास परवानगी देऊ नका, असे आमदारांनी पत्रात नमुद केले आहे. या पत्रावर 10 आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.