कलम ३७० बद्दलच्या ऐतिहासिक प्रस्तावानंतर विविध नेत्यांनी ट्विटरद्वारे त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काय आहेत या प्रतिक्रिया? जाणून घेऊयात..
एम. के. स्टॅलिन(डी.एम.के. अध्यक्ष) - जम्मू काश्मीरच्या लोकांशी चर्चा न करताच कलम ३७० काढून घेण्यात आले. लोकशाहीचा खून झाला आहे.
सरकारने काश्मीरमधील नेत्यांना विश्वासात घेऊन यावर निर्णय घ्यायला हवा होता, जे सरकारने केले नाही. - शरद पवार (पक्षाध्यक्ष ,राष्ट्रवादी काँग्रेस)
लेखक चेतन भगत याने 'काश्मीर आता अखेर स्वतंत्र झाला' अशा आशयाचे ट्विट केले आहे.
मेहबुबा मुफ्ती यांनी जद(यु)ने या निर्णयाला केलेल्या विरोधाचे स्वागत करत, इतर विरोधी पक्षांनादेखील या निर्णयाचा विरोध करण्याचे आवाहन केले.
अरुण जेटली - इतिहासातील एक घोडचूक सुधारल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन.
सुषमा स्वराज - खूप साहसी आणि ऐतिहासिक निर्णय, 'श्रेष्ठ भारत-एक भारत'ला सलाम!
आदित्य ठाकरे - भारतासाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. जम्मू आणि काश्मीर आता खऱ्या अर्थाने भारताचा भाग झाले आहे. फुटीरतावाद्यांनी नव्हे, तर नागरिकांनी एका सुरक्षित, विकासात्मक आणि खुल्या जम्मू काश्मीरचा मार्ग मोकळा केला आहे.