नवी दिल्ली - दोन वर्षांपूर्वी दोन हजाराची नोट बाजारात आली. आता २० रुपयांची नवी नोट बाजारात येत आहे. गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या सहीनिशी ही नोट बाजारात येईल, अशी घोषणा रिझर्व बँकेकडून करण्यात आली आहे.
लवकरच २० रुपयांची नोट बाजारात, 'अशी' असेल नवी नोट - reserve
२० रुपयांची ही नवी नोट हिरवट पिवळ्या रंगाची असले. तिच्या पाठीमागच्या बाजूला वेरुळ लेण्यांचे छायाचित्र असेल. जे भारतीय संस्कृतीचा वारसा दर्शविते, अशी माहिती रिझर्व बँकेने दिली. लवकरच ही नोट चलनात येईल.
२० रुपयांची नवी नोट

या नोटेचा आकार ६३ मीमी लांब आणि १२९ मीमी रुंद असेल. नोटेच्या समोरच्या भागावर रोमन आणि देवनागरी लिपीमध्ये आकडे असतील. तसेच, नोटेच्या मध्यभागी महात्मा गांधींचे छायाचित्र असेल. त्यावर आरबीआय, भारत, इंडिया आणि २० ही नावे लिहिलेली असतील.