महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मी संवेदनशिल माणूस, मंदीबद्दलच्या वक्तव्यावरून रविशंकर प्रसादांचे घुमजाव - रविशंकर प्रसाद पत्रकार परिषद

तीन ब्लॉकबस्टर चित्रपटांनी एका दिवसात १२० कोटी रुपये कमावले, हे विधान तथ्यांच्या आधारावर योग्य आहे. मात्र, माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, असे म्हणत रविशंकर प्रसाद यांनी त्यांचे वक्तव्य मागे घेतले आहे.

रविशंकर प्रसाद

By

Published : Oct 13, 2019, 11:45 PM IST

नवी दिल्ली - २ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या ३ चित्रपटांनी १२० कोटींची कमाई केली. त्यामुळे देशामध्ये मंदी कशी? असा अजब तर्क केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये बोलताना लावला होता. मात्र, टीकेची झोड उठताच कायदा मंत्र्यांनी त्यांचे वक्तव्य मागे घेतले आहे. माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला. मी संवेदनशील माणूस असल्याने मी माझे वक्तव्य मागे घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

रविशंकर प्रसाद यांचे प्रसिद्धी पत्रक

हेही वाचा -चित्रपटांचा गल्ला कोट्यवधींचा, मग अर्थव्यवस्थेत मंदी कशी; कायदेमंत्र्यांचा अजब तर्क

तीन ब्लॉकबस्टर चित्रपटांनी एका दिवसात १२० कोटी रुपये कमावले, हे विधान तथ्यांच्या आधारावर योग्य आहे. मात्र, माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, असे ते म्हणाले. यावर स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांनी प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. मुंबईमध्ये एका पत्रकाराने अर्थव्यवस्थेच्या स्थितीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी चित्रपटांच्या कमाईचे उदाहरण दिले होते.

रवी शंकर प्रसाद यांनी आज प्रसिद्धीपत्रक जारी करुन या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. आम्हाला चित्रपटसृष्टीचा खूप अभिमान आहे. लाखो लोकांना चित्रपट उद्योगातून रोजगार मिळतो. कराच्या रुपाने देखील चित्रपटसृष्टीचे मोठे योगदान आहे. अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी केलेल्या कामांची मी माहिती दिली. नरेंद्र मोदी सर्वसामान्य नागरिकांच्या संवेदनशिलतेची काळजी घेते, असे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा - बेरोजगारीचा 'एनएसएसओ'चा अहवाल चुकीचा - रवीशंकर प्रसाद

माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, तरीही संवेदनशील व्यक्ती असल्याने माझे वक्तव्य माघारी घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details