भोपाळ - देशभरात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढतानाच दिसत आहे. मध्यप्रदेशच्या राजगढमध्ये बस स्थानकावर थांबलेल्या एका बसमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी एन. के. नाहर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने आपली अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. ती इंदूरला आपल्या भावाला भेटण्यास गेली होती, त्यानंतर ती बेपत्ता झाली होती. त्याबाबत तपास सुरू असताना, तिला ब्याओरा बसस्थानकावर दोन व्यक्तींसोबत पाहण्यात आले. त्यांची चौकशी केली असता, त्यांच्यापैकी एकाने तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार त्या मुलीने केली.