'भाजपच्या खात्यातील रकमेत वाढ, मात्र देशातील रोजगारात घट' - Randeep Singh Surjewala hits out at modi
देशातील वाढत्या बेरोजगारीवरून काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केंद्र सरकावर निशाणा साधला आहे.
रणदीप सिंह
नवी दिल्ली -देशातील वाढत्या बेरोजगारीवरून काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. दरवर्षी 2 कोटी रोजगार देण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. मात्र जशी-जशी भाजपच्या खात्यातील रक्कम वाढत आहे. तस-तशी देशातील रोजगारात घट झाली आहे, असे रणदीप सुरजेवाला यांनी टि्वट करून म्हटले आहे.
आर्थिक संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था मंदीच्या टोकावर पोहोचली आहे. त्यासोबत देशाचे राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा विकासदर हा विक्रमी घसरला आहे. तर गेल्या पन्नास वर्षात सर्वाधिक बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. देशाच्या आर्थिक स्थितीच्या दृष्टीने एक चिंतेची बातमी आहे.