महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'जामीनासाठी कुराणच्या ५ प्रती वाटा,' न्यायालयाची रिचाला विचित्र अट; ती म्हणते, हा माझ्या मूलभूत अधिकाराचा भंग

'एका समाज माध्यमावर पडलेली पोस्ट पुढे पाठवल्याबद्दल मला अशा प्रकारची शिक्षा देण्यात येते. मात्र, इतर समाजांमधील लोकांच्या पोस्टमुळे आमच्या भावना दुखावतात, तेव्हा त्यांना हनुमान चालिसाची पुस्तके वाटण्यास सांगण्यात येत नाही. हे योग्य नाही,' असेही तिने म्हटले आहे.

रिचा भारती

By

Published : Jul 17, 2019, 3:32 PM IST

रांची - झारखंड येथील रांची येथे न्यायालयाने विचित्र निर्णय दिला आहे. रांची महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी रिचा भारती हिला जामीन मंजूर करण्यासाठी चक्क कुराणच्या ५ प्रतींचे वाटप मुस्लीम संस्थांमध्ये करण्याचे आदेश दिले आहेत. या विद्यार्थिनीला समाज माध्यमांवर पोस्ट टाकून मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल अटक करण्यात आली होती. न्यायालयाच्या अजब निर्णयानंतर 'हा माझ्या मूलभूत अधिकाराचा भंग' असल्याचे तिने म्हटले आहे.

सिव्हिल कोर्टाचे मॅजिस्ट्रेट मनीष सिंह यांनी रिचा भारतील या प्रकरणी जामीन मंजूर केला. त्यासाठी तिला पिठोरिया पोलीस ठाण्याअंतर्गत अंजुमन इस्लामिया समिती येथे कुराणच्या ५ प्रतींचे वाटप करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, रिचा हिने ही पोस्ट टाकताना आपली कोणाच्या भावना दुखावण्याची इच्छा नव्हती, असे म्हटले आहे. 'ही पोस्ट मी स्वतः तयार केली नाही. ती एका माध्यमावर पडली होती. मी केवळ ती फेसबुकवर पुढे पाठवली. शिवाय, यामध्ये मुस्लीम धर्मियांच्या भावना दुखावतील, असा मजकूर नव्हता. तसेच, मला माझ्या देवांविषयी बोलण्याचा अधिकार आहे. हा निर्णय म्हणजे माझ्या मूलभूत अधिकाराचा भंग आहे. मी न्यायालयाचा सन्मान करते. मात्र, या निर्णयावर मी असमाधानी असून उच्च न्यायालयात अपील करण्याच्या विचारात आहे,' असे रिचाने म्हटले आहे.

'एका समाज माध्यमावर पडलेली पोस्ट पुढे पाठवल्याबद्दल मला अशा प्रकारची शिक्षा देण्यात येते. मात्र, इतर समाजांमधील लोकांच्या पोस्टमुळे आमच्या भावना दुखावतात, तेव्हा त्यांना हनुमान चालिसाची पुस्तके वाटण्यास सांगण्यात येत नाही. हे योग्य नाही,' असेही तिने म्हटले आहे.

न्यायलयाच्या या निर्णयानंतर समाजातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विशेषत: उजव्या विचारसणीच्या लोकांकडून तीव्र प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. हिंदु जागरण मार्चचे नेते स्वामी दिव्यानंद यांनी हे एक कारस्थान असल्याचे म्हटले आहे. 'लोक हिंदू धर्माविषयी अत्यंत आक्षेपार्ह बाबी फेसबुकवर दररोज लिहित असतात. आमच्या देवी, देवतांविषयी अपमानकारक भाषा वापरली जाते. मात्र, त्यावरून कोणताही वाद उत्पन्न होत नाही. मात्र, आता झालेला हा प्रकार एखाद्या मोठ्या कारस्थानाचा भाग आहे,' असे ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details