महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आठवलेंनी हसवले; 'राहुलजी, तुमची सत्ता होती, तेव्हा तुमच्यासोबत होतो, आता मोदींची हवा आहे' - sonia gandhi

आठवले म्हणाले, 'निवडणुकीपूर्वी अनेकदा काँग्रेसने आपल्याला त्यांच्यासोबत येण्याची विनंती केली होती. पण मी म्हणालो, तिकडे जाऊन काय करू? हवा मोदींच्या दिशेने निघाली होती. हे मी अचूक ओळखले आणि भाजपासोबतच राहण्याचा निर्णय घेतला.'

रामदास आठवले

By

Published : Jun 19, 2019, 4:45 PM IST

नवी दिल्ली - १७ व्या लोकसभेचे पहिले सत्र सुरू झाले आहे. सर्वांचे शपथविधी संपल्यानंतर आज एकमताने अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड झाली. यावरून कविता करत खासदार रामदास आठवले यांनी उपस्थितांमध्ये खसखस पिकवली. ‘एका देशाचे नाव आहे रोम, लोकसभेचे अध्यक्ष झाले बिर्ला ओम’ असे म्हणत त्यांनी या कार्यकाळातील कवितेचा शुभारंभ केला. यामुळे उपस्थितांसह गंभीर स्वभावाच्या अध्यक्षांच्या चेहऱयावरही हसू पसरले.

आठवले यांनी राहुल गांधींना पुन्हा निवडून आल्याबद्दल तसेच, त्यांच्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा दिल्या. आपल्या अनोख्या शैलीतून 'नरेंद्र मोदींचे मन विशाल, राहुल गांधी राहो खुशाल' असे म्हणताच सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरून समानपणे हास्याचे फवारे निघाले. आठवलेंच्या बोलण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राहुल गांधी आणि सोनिया गांधीनाही हसू आवरता आले नाही.

आठवले यांची कविता –

‘एक देश का नाम है रोम, लोकसभा के अध्यक्ष बन गए बिर्ला ओम'

लोकसभा का आपको अच्छी तरह चलाना है काम, वेल में आने वालों का ब्लैक लिस्ट में डालना है नाम

नरेंद्र मोदी और आपका दिल है विशाल, राहुल जी आप रहो खुशहाल

हम सब मिलकर एकता की मशाल, भारत को बनाते हैं और भी विशाल

आपका राज्य है राजस्थान, लेकिन लोकसभा की आप बन गए शान

भारत की हमें बढ़ानी है शान, लोकसभा चलाने के लिए आप हैं परफेक्ट हैं मैन’

काँग्रसला मारली कोपरखळी

आठवले म्हणाले, 'निवडणुकीपूर्वी अनेकदा काँग्रेसने आपल्याला त्यांच्यासोबत येण्याची विनंती केली होती. पण मी म्हणालो, तिकडे जाऊन काय करू? हवा मोदींच्या दिशेने निघाली होती. हे मी अचूक ओळखले आणि भाजपासोबतच राहण्याचा निर्णय घेतला.' जनतेने सरकारला दिलेला कौल पाहता विरोधकांनीही सभागृहाच्या कामकाजात सत्ताधारी पक्षाला मदत करावी, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली. तसेच, आपले सरकार सर्व राज्यांना समान न्याय देईल. पुढील पाच काय तर वर्षानुवर्ष आमचे सरकार येत राहील. आम्ही काँग्रेसला सत्तेत येऊच देणार नाही, असा मिश्कील टोलाही त्यांनी यावेळी लगावला. यानंतर संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला.

ABOUT THE AUTHOR

...view details