पाटणा- लोक जनशक्ती पार्टीचे खासदार रामचंद्र पासवान यांचे आज (रविवारी) निधन झाले. ते केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांचे भाऊ होते. रामचंद्र पासवान हे लोजपाचे बिहारमधील समस्तीपूरा मतदारसंघाचे खासदार होते.
लोक जनशक्ती पार्टीचे खासदार रामचंद्र पासवान यांचे निधन - अँजिओग्राफी
रामचंद्र पासवान यांना 10 जुलैला हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर आरएमएल रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यावर अँजिओग्राफी देखील करण्यात आली होती. मात्र, आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
लोक जनशक्ती पार्टीचे खासदार रामचंद्र पासवान यांचे निधन
रामचंद्र पासवान यांना 10 जुलैला हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर आरएमएल रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यावर अँजिओग्राफी देखील करण्यात आली होती. मात्र, आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
रामचंद्र पासवान हे समस्तिपूरामधून चार वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत त्यांनी काँग्रेस उमेदवार डॉ. अशोक कुमार यांचा अडीच लाख मतांनी पराभव केला होता.