नवी दिल्ली - समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांनी भाजप खासदार रमा देवी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. या वेळी, लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरु होती आणि रमा देवी अध्यक्षांच्या खुर्चीवर बसल्या होत्या. यानंतर आझम खान माफीसुद्धा न मागता आपण काही चुकीचे बोलले नसल्याचे सांगत लोकसभेतून बाहेर पडले होते. यानंतर रमा देवींनी 'तुझ्यासारख्या पुरुषाला तोंड देण्याइतकी ताकद माझ्यात आहे,' असे म्हणत आझम खान यांच्यावर हल्ला चढवला आहे.
लोकसभेत एक शेर ऐकवताना खान यांनी रमा देवींविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. यावर रमादेवी यांनी 'माफी मागितली तरी, आता माफ करणे शक्य नाही. तुझ्यासारख्या पुरुषाला तोंड देण्याइतकी ताकद माझ्यात आहे,' असे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'मी ज्या खुर्चीवर बसले होते, ती केवळ माझी नाही तर, सर्वांची खुर्ची आहे. त्यांनी देशातील सर्व महिलांचा अपमान केला आहे. माझ्या लोकसभा मतदार संघातील लोकांनी माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवला आणि मला पुन्हा निवडून दिले आहे. त्यामुळे तुझ्यासारख्या पुरुषाला तोंड देण्याइतकी ताकद माझ्यात आहे,' असे रमा देवींनी म्हटले आहे.
आझम खान काय म्हणाले ?
तुझ्यासारख्या पुरुषाला तोंड देण्याइतकी ताकद माझ्यात आहे, रमा देवींचा आझम खान यांच्यावर हल्ला
'मी ज्या खुर्चीवर बसले होते, ती केवळ माझी नाही तर, सर्वांची खुर्ची आहे. त्यांनी देशातील सर्व महिलांचा अपमान केला आहे. माझ्या लोकसभा मतदार संघातील लोकांनी माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवला आणि मला पुन्हा निवडून दिले आहे. त्यामुळे तुझ्यासारख्या पुरुषाला तोंड देण्याइतकी ताकद माझ्यात आहे,' असे रमा देवींनी म्हटले.
आझम खान बोलण्यासाठी उभे राहिले. त्यांनी शेर ऐकवत ‘तू इधर-उधर की ना बात कर...’ अशी सुरुवात केली. नंतर मात्र, त्यांची गाडी रुळावरून घसरली. ते म्हणाले, 'तुम्ही मला इतक्या आवडता की, तुमच्या डोळ्यात डोळे घालून पाहत राहावेसे वाटते.' यावर आक्षेप घेत रमा देवी यांनी ही बोलण्याची पद्धत नाही, असे सांगितले. त्यानंतर आझम खान यांनी 'तुम्ही खूप आदरणीय आहात, माझ्या बहिणीप्रमाणे आहात' असे म्हटले. मात्र, खान यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भाजप खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.