अयोध्या- सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबर 2019 ला राम मंदिर आणि बाबरी मस्जिद विवादावर निर्णय सुनावला होता. मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय खंडपीठाने या विवादातील 2. 77 जमीन राम मंदिराच्या निर्माणासाठी दिली होती. यानंतर लगेचच अयोध्येत राम मंदिराच्या कामाला सुरुवात झाली.
असे आहेत अयोध्या मंदिरातील रामलल्ला, पाहा फोटो - ramlala photos
केंद्र सरकारने मंदिराच्या निर्माणासाठी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची स्थापनाही केली. मंदिराच्या कामकाजाला सुरुवातही झाली. मात्र, याच दरम्यान देशात कोरोनाचा शिरकाव झाला. संतांच्या मागणीनुसार, रामलल्ला यांची मुर्ती टिन शेडमधून काही काळासाठी फाइबरच्या मंदिरात विराजित केली गेली.
न्यायालयाच्या आदेशानुसार, केंद्र सरकारने मंदिराच्या निर्माणासाठी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची स्थापनाही केली. मंदिराच्या कामकाजाला सुरुवातही झाली. मात्र, याच दरम्यान देशात कोरोनाचा शिरकाव झाला. संतांच्या मागणीनुसार, रामलल्ला यांची मुर्ती टिन शेडमधून काही काळासाठी फाइबरच्या मंदिरात विराजित केली गेली. 25 मार्चला ही मूर्ती फाइबर शेडमध्ये ठेवण्यात आली.
अयोध्या विवादाचे सुरुवात 23 डिसेंबर 1949 पासून झाली. याच काळात रामाची मुर्ती मस्जिदमध्ये आढळली. 6 ऑगस्ट 2019 ला सर्वोच्च न्यायालयाने इलाहाबाद न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकांवर सुनावणी सुरु केली. 9 नोव्हेंबरला पाच सदस्यांच्या संविधान पिठाने संपूर्ण 2.77 एकर जमीन राम मंदिराच्या निर्माणासाठी दिली. मंदिराच्या निर्माणासाठी करण्यात आलेल्या खोदकामात अनेक पुरातन मूर्ती आणि खांब सापडले आहेत.