अयोध्या - राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टची आज(शनिवार) अयोध्येत बैठक होणार आहे. या बैठकीत मंदिरच्या बांधकामासाठी भूमीपूजनाची तारीख ठरण्याची शक्यता आहे. संस्थानाचे अनेक सदस्य अयोध्येत पोहचले आहेत. ट्रस्टचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा बैठकीसाठी बुधवारी अयोध्येत आले आहेत. बैठकीची वेळ मात्र, समजू शकली नाही.
ट्रस्टचे इतर सदस्य गोविंद गिरी, कामेश्वर चौपाल आणि युगपुरुष स्वामी परमानंद आयोध्येत आले आहेत. इतर दोन सदस्य उत्तरप्रदेशचे अतिरिक्त आयुक्त अविनाश अवस्थी आणि अतिरिक्त गृह सचिव ग्यानेश कुमार अयोध्येत आले आहेत. जे सदस्य कोरोनामुळे येऊ शकत नाही, ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीशी जोडले जाणार आहेत.