महाराष्ट्र

maharashtra

हाथरस प्रकरणी भाजप गप्प का? दिग्विजय सिंग यांचा सवाल

By

Published : Oct 19, 2020, 6:43 PM IST

मध्य प्रदेशमधील महिला मंत्र्यांना उद्देशून माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी एक वादग्रस्त विधान केले होते. या प्रकरणानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार दिग्विजय सिंग यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

Digvijay Singh
राज्यसभा खासदार दिग्विजय सिंग

भोपाळ -मध्य प्रदेशमधील महिला मंत्र्यांना उद्देशून माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी एक वादग्रस्त विधान केले होते. या प्रकरणानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार दिग्विजय सिंग यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. महिलांबद्दल असंवेदनशील असलेले भाजप हाथरस प्रकरणावर गप्प का? असा प्रश्न दिग्विजय सिंग यांनी विचारला आहे. तसेच सिंग यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावरही टीका केली आहे.

राज्यसभा खासदार दिग्विजय सिंग यांची प्रतिक्रिया

मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. भाजपा आणि काँग्रेस हे दोन्ही मोठे पक्ष ही निवडणूक जिंकण्यासाठी जोर लावत आहेत. या दरम्यान, निवडणुकीत प्रचार दौरे मोठ्या जोशात सुरू आहेत. अशात नेते मंडळी आक्षेपार्ह वक्तव्य करताना पाहायला मिळत आहेत. असेच वक्तव्य काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केले होते.

हेही वाचा -जबाबदारी झटकू नका; केंद्राबरोबर राज्यानेही भरीव मदत करण्याची गरज

झाले असे की, ग्वाल्हेरच्या डबरा विधानसभा जागेवर काँग्रेसचे उमेदवार सुरेश राजे यांच्यासाठी कमलनाथ यांनी प्रचार दौरा केला. या दौऱ्यादरम्यान, त्यांनी मध्य प्रदेशच्या मंत्री आणि भाजपा नेत्या इमरती देवी यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला.

ABOUT THE AUTHOR

...view details