नवी दिल्ली - 'शीलाजी यांची देशातील एक काळ गाजवलेल्या राजकीय नेत्यांमध्ये गणना करण्यात येईल. त्यांची राजकीय कारकीर्द कलंकरहित होती,' अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना आदरांजली वाहिली. त्यांचे पुत्र संदीप दीक्षित यांच्याशीही त्यांनी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले. शीला दीक्षित यांचे शनिवारी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची शीला दीक्षित यांना आदरांजली
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना आदरांजली वाहिली. त्यांचे पुत्र संदीप दीक्षित यांच्याशीही त्यांनी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले.
राजनाथ सिंह
दरम्यान, कठुआ येथील उझ येथील पुलाचे उद्घाटन करताना सिंह यांनी काश्मीर प्रश्न सोडवण्याच्या मुद्द्यावर भर दिला. तसेच, 'जगातील कोणतीही शक्ती हे थांबवू शकत नाही,' असे ते म्हणाले.
काश्मीर प्रश्न सोडवणारच
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी 'काश्मीर प्रश्न सोडवणारच. जगातील कोणतीही शक्ती हे थांबवू शकत नाही,' अशी गर्जना केली आहे. ते 'उझ पुला'च्या उद्घाटनावेळी बोलत होते. सीमा रस्ता संस्थेने (बीआरओ - बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन) हा पूल बनवला आहे.
पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाविषयी विचारले असता, 'देशाचे नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी आणि लष्कराचे जवान व अधिकारी यांच्यावरील विश्वासाला तडा जाऊ देऊ नका,' असे ते म्हणाले.'बीआरओने प्रथमच इतका मोठा पूल बनवला असून यामुळे स्थानिक नागरिकांचा मोठा फायदा होणार आहे. येथील रहिवाशांनी अनेक दिवसांपासून याची मागणी केली होती. मी बीआरओचे अहिनंदन करू इच्छितो,' असे ते म्हणाले. दरम्यान, राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरमधल्या द्रास सेक्टरमधील कारगिल युद्ध स्मारकाला भेट दिली. तिथे हुतात्मा जवांनाच्या स्मृतीस अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी ‘वीरभूमी’ला भेट दिली.