महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

​​​​​​​राजीव गांधी हत्या प्रकरणातील ७ आरोपींना मुक्त करा; आरोपीचे मुख्यमंत्र्यांना पत्र - rajiv gandhi

सध्याची राजकीय संधी साधून पलानीस्वामी यांनी आपल्यासह इतर ६ आरोपींना तुरुंगातून मुक्त करावे, असे पत्र नलिनीने पलानीस्वामींना लिहिले आहे. गेल्या २७ वर्षांपासून आम्ही तुरुगांत असून ही आयुष्य जगण्याची आमची शेवटची संधी असल्याचे तिने म्हटले आहे.

राजीव गांधी

By

Published : Feb 23, 2019, 8:28 PM IST

चेन्नई -राजीव गांधी हत्या प्रकरणातील जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ७ आरोपींना लवकरात लवकर मुक्त करा, अशी विनंती या प्रकरणात शिक्षा भोगणाऱ्या नलिनी श्रीहरनने तमिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांना पत्र लिहून केली आहे.

सध्याची राजकीय संधी साधून पलानीस्वामी यांनी आपल्यासह इतर ६ आरोपींना तुरुंगातून मुक्त करावे, असे पत्र नलिनीने पलानीस्वामींना लिहिले आहे. गेल्या २७ वर्षांपासून आम्ही तुरुगांत असून ही आयुष्य जगण्याची आमची शेवटची संधी असल्याचे तिने म्हटले आहे.

राज्यातील सध्याच्या राजकीय बदलांमुळे आम्हाला विश्वास आहे की, मुख्यमंत्री पलानीस्वामी तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची याविषयी मनधरणी करतील. यामुळे आमची तुरुंगातून सुटका होईल. ही आमची शेवटची आशा असून आमचे आयुष्य आता मुख्यमंत्र्यांच्याच हातात असल्याचे नलिनीने पत्रात म्हटले आहे.

संविधानातील कलम १६१ चा वापर करून राजीव गांधींच्या हत्येतील ७ आरोपींची सुटका करण्यात यावी, असे गेल्यावर्षी ९ सप्टेंबरला तमिळनाडू राज्य मंत्रिमंडळाने राज्यपालांना सुचविले होते. मात्र, राज्यपालांनी याप्रकरणी कुठलाच निर्णय घेतला नव्हता. आपल्या सुटकेबाबत राज्यपालांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, या मागणीसाठी नलिनी तुरुंगातच आमरण उपोषण करत आहे.

काय आहे प्रकरण?

तमिळनाडूमध्ये मे १९९१ मध्ये निवडणूक रॅली करत असताना तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींची हत्या करण्यात आली होती. 'लिबरेशन टायगर ऑफ तमिळ इलम' (लिट्टे) या संघटनेने राजीव गांधींची हत्या घडवून आणली होती. एका सुसाईड बॉम्बरने गांधींच्या गळ्यात हार टाकताच स्फोट झाला होता. यात त्यांचा मृत्यू झाला होता. या स्फोटात इतर १४ जणांचाही मृत्यू झाला होता. या मृत व्यक्तींचे नातेवाईक यातील आरोपींच्या सुटकेचा विरोध करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details