नवी दिल्ली - कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. सर्व सामान्य गाड्या रद्द करण्यात आल्या असून ठराविक मार्गावर विशेष गाड्या सुरू आहेत. त्यामध्ये आता आणखी ४० गाड्यांची भर पडणार आहे. आणखी ४० विशेष गाड्या(दोन्ही मार्गे) सरू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाने दिली.
आणखी ४० विशेष गाड्या सुरू करण्याचा रेल्वे बोर्डाचा निर्णय - Vinod Kumar Yadav
१२ सप्टेंबरपासून या ४० विशेष गाड्या धावणार असून १० तारखेपासून तिकीट आरक्षित करता येणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे संचालक विनोद कुमार यादव यांनी दिली.
१२ सप्टेंबरपासून या ४० विशेष गाड्या धावणार असून १० तारखेपासून तिकीट आरक्षित करता येणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे संचालक विनोद कुमार यादव यांनी दिली. सुरळीत रेल्वे सेवा सुरू होण्याबाबत मागील काही दिवसांपासून शक्यता वर्तविण्यात येत आहेत. मात्र, अनेक राज्यातील कोरोनाचा प्रसार कमी झाला नसल्याने सेवा सुरू करण्यात आली नाही.
केंद्रीय गृह मंत्रालयाने नुकतेच अनलॉक चारची घोषणा केली. यातही रेल्वे सेवा सुरु करण्याबाबत काहीही सांगण्यात आले नाही. लॉकडाऊन काळात देशातली अंतर्गत आणि परदेशी विमान सेवा बंद होती. मात्र, नंतर देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्यात आली. मात्र, रेल्वेबाबात अद्याप ठोस निर्णय घेण्यात आला नाही. राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) व नौदल अकादमी(एनए)च्या परीक्षांसाठी अप व डाऊन अशा २३ विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता जेईई आणि नीटच्या परीक्षांसाठीही विशेष गाड्या सोडण्याची मागणी करण्यात येत आहे.