नवी दिल्ली - दिवाळी काही दिवसांवरच आली असून दिवाळीच्या अगोदरच पश्चिम बंगालच्या नागरिकांना रेल्वे मंत्रालयाने आनंदाची बातमी दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने परवानगी दिली आहे. येत्या 11 नोव्हेंबरपासून पश्चिम बंगालमध्ये 696 उपनगरीय सेवा सुरु होणार आहे. रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी यासंदर्भात टि्वट करून माहिती दिली आहे.
पश्चिम बंगालमध्येही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून लोकल सेवा बंद होती. त्याला आता परवानगी मिळाली आहे. प्रवासादरम्यान कोरोनासंबधित सर्व नियमांची काळजी घेतली जाणार आहे. तथापि, मुंबईकर अद्यापही लोकल सेवा सुरू होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.