पुणे - केंद्र सरकारने घरगुती वापराच्या सिलेंडरची सबसिडी दान करण्यासाठी राबवलेल्या उपक्रमाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. आता हा उपक्रम रेल्वेच्या तिकीटांवरील सबसिडीलाही लागू होणार आहे. रेल्वेच्या तिकीटांवर जवळपास ५० टक्के सबसिडी दिली जात असून त्या रक्कमेचा त्याग करण्याचे आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.
आता रेल्वेच्या तिकिटांवरही 'गिव्ह इट अप'; सबसिडी सोडण्यासाठी नागरिकांना केंद्र सरकारचे आवाहन
केंद्र सरकारचा घरगुती वापराच्या सिलिंडरची सबसिडी दान करण्यासंबंधीचा उपक्रम आता रेल्वेच्या तिकिटांवरील सबसिडीलाही लागू होणार आहे.
केंद्र सरकारचा घरगुती वापराच्या सिलिंडरची सबसिडी दान करण्यासंबंधीचा उपक्रम आता रेल्वेच्या तिकिटांवरील सबसिडीलाही लागू होणार आहे.
रेल्वेचे आर्थिक नुकसान कमी करण्यासोबतच प्रवाशांना विविध सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलण्यात आले आहे. पाच वर्षांपूर्वी केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी घरगुती वापराच्या गॅसवरील सबसिडीचा त्याग करण्याचं आवाहन जनतेला केलं होतं. त्या योजनेला चांगला प्रतिसाद लाभल्यानंतर सरकारने रेल्वेवरील आर्थिक भार हलका करण्याचा प्रयत्न केला आहे.