महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

LIVE : उत्तर प्रदेश पोलिसांच्या धक्काबुक्कीत जमिनीवर पडले राहुल गांधी

राहुल
राहुल

By

Published : Oct 1, 2020, 2:52 PM IST

Updated : Oct 1, 2020, 4:47 PM IST

16:09 October 01

15:53 October 01

15:38 October 01

राहुल गांधींना कलम 188 अंतर्गत अटक

पोलिसांकडून होणाऱ्या धक्काबुक्कीत राहुल गांधी जमिनीवर पडले

15:37 October 01

काँग्रेसची योगी आदित्यानाथ यांच्यावर टीका

15:28 October 01

राहुल गांधींकडून ट्विटरच्या माध्यमातूनही योगी आदित्यनाथ सरकारवर हल्लाबोल

15:18 October 01

साथीच्या आजार कायद्याचे उल्लघंन केल्यामुळे आम्ही त्यांना इथेच थांबावलं आणि पुढे जाऊ दिले नाही, असे अतिरिक्त जिल्हा पोलीस आयुक्त रणविजय सिंग यांनी सांगितले.

15:11 October 01

प्रियांका गांधी

15:11 October 01

राहुल-प्रियांका हाथरसर दौऱ्यावर

14:37 October 01

पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी पायी चालत जाणाऱ्या राहुल गांधींना धक्काबुक्की, रोखण्याचा प्रयत्न

लखनऊ - उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणावर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आज काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जात असताना त्यांना यमुना एक्सप्रेस पोलिसांनी थांबवले. यावेळी फक्त दोघांनाच पुढे जाण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसोबत पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, यावेळी  पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की झाली.  

'पोलिसांनी मला धक्का दिला आणि माझ्यावर लाठीचार्ज केला. या देशात फक्त मोदीच पायी चालू शकतात का, सामान्य नागरिक पायी चालू शकत नाही, असा सवाल राहुल गांधींनी केला. आमच्या गाड्या थांबवण्यात आल्या नंतर आम्ही पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला', असे ते म्हणाले.  

जिल्ह्यात 144 कलम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले असून सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत.  

Last Updated : Oct 1, 2020, 4:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details