लखनौ- राहुल गांधी बहीण प्रियंका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधीया यांच्यासह ४ दिवसाच्या लखनौ दौऱ्यावर आहेत. ते लखनौला पोहोचले असून त्यांचा रोड शो ला सुरुवात झाली आहे. त्यांचा हा रोड शो लखनौ विमानतळापासून काँग्रेस कार्यालयापर्यंत होणार आहे. एकूण १२ किलोमीटरचा रोड शो आहे.
लखनौ विमानतळापासून पक्षाच्या कार्यालयापर्यंत प्रियंका आणि राहुल गांधींचा 'रोड शो' - प्रियंका गांधी
हा एकूण १२ किलोमीटरचा 'रोड शो' असणार आहे. हा प्रियांका गांधीच्या राजकारणातील सक्रिय प्रवेशानंतरचा पहिला दौरा असून तो काँग्रेसच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
रोड शो
कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली आहे. पक्षाच्या मुख्यालयात अनेक नवीन खोल्या बांधल्या आहेत. तसेच, एक मीडिया हॉलही बांधण्यात आला आहे. प्रियांका यांच्या हस्ते या हॉलचे उद्घाटन होणार आहे. एका बैठकीदरम्यान, प्रियांका यांनी राज्यांमधून फोडाफोडीचे राजकारण संपवणार असल्याचे म्हटले होते. तसेच, लोकांना एकत्र आणणार असल्याचेही त्या म्हणाल्या होत्या.
Last Updated : Feb 11, 2019, 4:43 PM IST