नवी दिल्ली - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि आपचे अरविंद केजरीवाल यांना राजद्रोहाचा कायदा संपवायचा आहे. ते सत्तेत आले तर असे करतील, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी दिल्लीतील एका सभेत केले.
केजरीवाल, राहुल गांधींना राजद्रोह कायदा संपवायचा आहे - अमित शाह
शाह म्हणाले, की राहुल गांधी याबद्दल उघड बोलतात. केजरीवाल बोलत नाहीत. पण, दोघांनाही राजद्रोहाचा कायदा संपवायचा आहे. उद्या जर कोणी पाकिस्तानसाठी हेरगिरी केली, तर त्याला कोणत्या कायद्याखाली अटक करणार? असा प्रश्नही शाहांनी उपस्थित लोकांना विचारला.
शाह म्हणाले, की राहुल गांधी याबद्दल उघड बोलतात. केजरीवाल बोलत नाहीत. पण, दोघांनाही राजद्रोहाचा कायदा संपवायचा आहे. उद्या जर कोणी पाकिस्तानसाठी हेरगिरी केली, तर त्याला कोणत्या कायद्याखाली अटक करणार? असा प्रश्नही शाहांनी उपस्थित लोकांना विचारला. यावेळी त्यांनी २०१६ मध्ये जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील घटनेचा संदर्भ दिला. ते म्हणाले, की हा कायदा नसता तर देशविरोधी घोषणा देणारे कारागृहात नसते.
अमेठीमध्ये यावेळी भाजप नक्की विजयी होईल, असा विश्वास शहांनी व्यक्त केला. ते म्हणाले, की मी आताच अमेठीतून आलो. मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो, की यावेळी अमेठीत कमळ फुलेल. शाह यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा केजरीवालांकडे वळवत त्यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, की मी इथे परत येईन आणि केजरीवालांनी ज्या चुकीच्या गोष्टी केल्या त्या उघड करीन. दिल्ली १२ तारखेला मतदान होणार आहे.