नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोरोना विषाणूवर बुधवारी आपल्या टि्वटर खात्यावरून एक वादग्रस्त टि्वट प्रसिद्ध केले होते. त्या टि्वटमध्ये त्यांनी जम्मू काश्मीर हे पाकिस्तानचा हिस्सा असल्याचे दाखवले होते. चुक लक्षात येताच त्यांनी काही वेळातच ते टि्वट डिलीट केले आहे.
राहुल गांधींनी शेअर केला भारताचा चुकीचा नकाशा, नेटेकऱ्यांनी केले ट्रोल - wrong indian map
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोरोना विषाणूवर बुधवारी आपल्या टि्वटरवरून एक वादग्रस्त टि्वट प्रसिद्ध केले होते.
कोरोना विषाणुपासून आपल्या देशाला आणि अर्थव्यवस्थेला गंभीर धोका आहे. मात्र, सरकार कोरोना विषाणूला गंभीरपणे घेत नसल्याचे माझ मत आहे. कोरोनो विषाणूचा संसर्ग पसरू नये यासाठी योग्यवेळी पाऊल उचण्याची गरज आहे, असे टि्वट राहुल गांधी यांनी केले होते. या टि्वटसोबत त्यांनी नकाशाचे छायाचित्र टि्वट केले होते. त्या नकाशात जम्मू-काश्मीरचा पूर्व भाग हा पाकिस्तानमध्ये असल्याचे दिसत होते.
राहुल गांधींच्या टि्वटनंतर भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. तुम्ही नेहमी जम्मू-काश्मीर हे पाकिस्तानमध्ये दाखवणाऱ्या नकाशाचा वापर का करता?, असे अमित मालवीय म्हणाले. दरम्यान, भाजपच्या काही नेत्यांसह नेटेकऱ्यांनीही राहुल गांधींच्या या टि्वटचा खरपूस समाचार घेतला. दरम्यान, राहुल गांधींनी ते टि्वट डिलीट करून दुसरे टि्वट केले आहे.