महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राहुल गांधी प्रथमच दोन मतदारसंघातून लढणार, यामुळे घेतला वायनाडमधून लढण्याचा निर्णय - Amethi

राहुल गांधी आणि काँग्रेस दक्षिण संस्कृती टिकवण्यासाठी लढत आहेत. उत्तर आणि दक्षिण भारतादरम्यानचे नाते अतूट आहे, असेही यावेळी बोलताना सुरजेवाला यांनी सांगितले.

काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी

By

Published : Mar 31, 2019, 11:35 AM IST

Updated : Mar 31, 2019, 1:40 PM IST

नवी दिल्ली- काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी केरळच्या वायनाड आणि अमेठीतून या दोन लोकसभा निवडणूक लढवणार, अशी अधिकृत घोषणा आज काँग्रेसने केली आहे. काँग्रेसने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी ज्येष्ठ काँग्रेस नेते ए.के.अँथनी, रणदीप सुरजेवाला उपस्थित होते.

राहुल गांधी पहिल्यांदाच २ ठिकाणांहून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. राहुल गांधींच्या केरळमधून निवडणूक लढवण्याबाबतचा निर्णय गेल्या आठवड्यात घेण्यात आला. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला असल्याचे सांगण्यात येत आहे. कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमधून राहुल यांनी निवडणूक लढवावी, अशी अनेकांनी इच्छा होती, असे सुरजेवाला यांनी सांगितले.

राहुल गांधी आणि काँग्रेस दक्षिण संस्कृती टिकवण्यासाठी लढत आहेत. उत्तर आणि दक्षिण भारतादरम्यानचे नाते अतूट आहे, असेही यावेळी बोलताना सुरजेवाला यांनी सांगितले. वायनाडमध्ये २३ एप्रिलला तर अमेठीमध्ये ६ मे रोजी मतदान होणार आहे.

Last Updated : Mar 31, 2019, 1:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details