महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राफेलच्या गायब फाईल्स ची चौकशी मनोहर पर्रीकर यांच्यापासून सुरू करा - राहुल गांधी - rahul gandhi

गायब झालेल्या फाईलमध्ये राफेलच्या किंमती मोदी यांनी कशा वाढविल्या. पुढील १० वर्षे राफेल एअरक्राप्ट भारताला मिळणार नाही, याची माहीती असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

राहुल गांधी

By

Published : Mar 9, 2019, 3:20 AM IST

पणजी - केंद्र सरकारने राफेलच्या फाईल्स गायब झाल्याचे सांगितले आहे. या गायब फाईल्सची चौकशी तत्कालीन संरक्षण मंत्री तथा गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची चौकशी करावी, असे प्रतिपादन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले. गोवा प्रदेश काँग्रेस आयोजित बूथस्तरीय कार्यकर्ता म्हणून मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी ते उपस्थित होते.

हिंदूस्थान एरोनोटिक लिमिटेड या सरकारी कंपनीला कंत्राट देण्याचा निर्णय संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने घेतला होता. परंतु, सरकार बदल्यानंतर सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राफेल कराराआधी काही दिवस स्थापन झालेल्या आपले मित्र अनिल अंबानी यांच्या कंपनीला कंत्राट देत ३० हजार कोटी त्यांच्या खिशात घातले. हे कंत्राट जर सरकारी कंपनीला मिळाले असते तर गोव्यातील एरोनेटिक क्षेत्रातील युवकांना रोजगार मिळाला असता.

राहुल गांधी

तत्कालीन संरक्षण मंत्री पर्रीकर यांनी राफेलच्या बदलेल्या कंत्राट विषयी आपल्याला काहीच माहीत नाही असे जगाला सांगितले आहे. त्यामुळे राफेलच्या गायब झालेल्या फाईल्सची चौकशी पर्रीकर यांच्यापासून केली पाहिजे. कारण अलिकडे त्यांची या संदर्भातील एक टेप प्रसिद्ध झाली आहे. ज्यामध्ये याच्या फाईल आपल्या जवळ आहेत आणि जर मुख्यमंत्री पद काढून घेण्याचा प्रयत्न झाला तर त्या जाहीर करणार असे म्हटले आहे.खाण बंदी आणि पर्यटकांची घटती संख्या या विषयी बोलताना ते म्हणाले, गोव्यातील खाण व्यवसाय बंदीमुळे लाखो लोकांवर बेरोजगारी ओढवली आहे. तर गब्बर सिंग टँक्समुळे पर्यटन व्यवसायावर परिणाम झाला आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे हे संकट ओढवले आहे. काँग्रेस सत्तेवर आले तर कायद्याच्या चौकटीत राहून खाण व्यवसाय सुरू केला जाईल.

भाजपने सर्वाधिक श्रीमंत १५ व्यक्तीना पैसे दिले. तर काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर गरीबांच्या खात्यात दरमहा ठराविक रक्कम जमा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामुळे गरीबांना किमान उत्पन्न मिळेल, असे सांगून गांधी म्हणाले. यावेळी प्रचारात राफेल, शेतकरी प्रश्न, बेरोजगारी आदी अनेक मुद्दे आहेत, ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर गोवा काँग्रेस प्रभारी डॉ. ए. चेल्लाकुमार, अखिल भारतीय महिला काँग्रेस सरचिटणीस अप्सरा रेड्डी,सरचिटणीस अमित देशमुख, काँग्रेस आमदार आणि काँग्रेसचे कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details