नवी दिल्ली -१७ व्या लोकसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी उद्या होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पुढचे २४ तास महत्त्वाचे असून मतमोजणी दरम्यान घडणाऱ्या घटनांकडे लक्ष द्या, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
पुढील २४ तास खूप महत्त्वाचे, सतर्क रहा - राहुल गांधी - hours
काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पुढचे २४ तास महत्वाचे असून मतमोजणी दरम्यान घडणाऱया घटनांकडे लक्ष द्या, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी
आपण सत्यासाठी लढत आहोत. मतदानोत्तर चाचणीचे निकाल चुकीचे आहेत. त्यामुळे या निकालाकडे पाहून निराश होऊ नका. स्वत:वर आणि पक्षावर विश्वास ठेवा. आपली मेहनत वाया जाणार नाही, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.