नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्विटच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. त्यांनी इंग्रजी शब्दकोशामध्ये Modilie (मोदी लाय) नावाचा नवा शब्द समाविष्ट झाल्याचे ट्विट केले आहे.
इंग्रजी शब्दकोशात 'मोदी लाय' हा नवा शब्द, राहुल गांधींचे ट्विट - Narendra Modi
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी इंग्रजी शब्दकोशामध्ये Modilie (मोदी लाय) नावाचा शब्द समाविष्ट झाल्याचे ट्विट केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी अनेक नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. पण आता जमाना बदल्यामुळे हे नेते त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून एकमेकांवर टीका करताना दिसून येतात. आज राहुल गांधींनी ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची फिरकी घेतली आहे. त्यांनी इंग्रजी शब्दकोशामध्ये Modilie हा नवा शब्द समाविष्ट झाल्याचे ट्विट केले आहे. तसेच त्या ट्विटखाली त्यांनी Modilie या शब्दाचे काही अर्थ ही दिले. सत्याची सातत्याने मोडतोड करणे, न थकता खोटे बोलणे आणि सवयीने थापा मारणे, असा अर्थ या मोदी लाय शब्दाचा असल्याचा दावाही गांधींनी केला.