महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गुजरातमध्ये ५८ वर्षांनंतर काँग्रेस कार्यसमितीची बैठक - congress

काँग्रेस आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'गृह राज्या'त निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याची चर्चा आहे. बैठकीनंतर गांधीनगरच्या अडालजमध्ये एका रॅली होणार आहे. यामध्ये प्रियांका गांधी सभेत भाषण करण्याची शक्यता आहे.

काँग्रेस कार्यसमिती बैठक

By

Published : Mar 12, 2019, 11:42 AM IST

अहमदाबाद - गुजरातमध्ये ५८ वर्षांनंतर काँग्रेस कार्यसमितीची (सीडब्ल्यूसी) बैठक होत आहे. प्रियांका गांधी प्रथमच कार्यसमितीच्या बैठकीला संबोधित करतील. पाटीदार आंदोलनातील युवा नेते हार्दिक पटेलही आज काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी आणि उत्तर प्रदेश पूर्वच्या महासचिव प्रियंका गांधी अहमदाबादमध्ये बैठकीच्या ठिकाणी पोहोचले आहेत.

काँग्रेस आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'गृह राज्या'त निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याची चर्चा आहे. बैठकीनंतर गांधीनगरच्या अडालजमध्ये एका रॅली होणार आहे. यामध्ये प्रियांका गांधी सभेत भाषण करण्याची शक्यता आहे. काँग्रेसने ही सभा १२ मार्चला घेण्याचे विशेष कारण आहे. आजच्या दिवशीच १९३० मध्ये गांधीजींनी दांडी यात्रेला सुरुवात केली होती.

राज्यात सीडब्ल्यूसीची याआधीची शेवटची बैठक १९६१ मध्ये भावनगर येथे झाली होती. बैठकीआधी गांधीजींच्या सावरमती आश्रमात एका प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. एका महिन्याच्या आत राहुल गांधींचा हा दुसरा गुजरात दौरा आहे. याआधी त्यांनी १४ फेब्रुवारीला वलसाड जिल्ह्यात सभा घेतली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details