बंगळुरु - भाजप नेता आणि प्रसिद्ध विनोदी अभिनेता असलेल्या 'जग्गेश'च्या 'रंगनायक' चित्रपटाचा टीजर नुकताच प्रसिद्ध झाला. मात्र, या टीजरवर सोशल मीडियातून जोरदार टीका होते आहे. कारण आहे, ते राहुल गांधी यांच्या नावाचा केलेला आक्षेपार्ह उच्चार.
या टीजरमध्ये अगदी सुरुवातीपासूनच भाजपचा प्रचार करण्यात आला आहे. यामध्येच, एक अभिनेता, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आडनावाचा आक्षेपार्ह असा उच्चार करताना दिसून येत आहे. यामुळे लोकांमध्ये, विशेषतः काँग्रेस समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.