महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

केरळच्या शेतकऱ्यांना कर्ज भरण्याची मुदत वाढवून द्या; राहुल गांधीचे RBI ला पत्र - शक्तिकांता दास

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना पत्र लिहले आहे.

केरळच्या शेतकऱ्यांसाठी राहुल गांधीचे RBI ला पत्र

By

Published : Aug 14, 2019, 5:00 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना पत्र लिहले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना डिसेंबर 2019 पर्यंत कर्ज भरण्याची मुदत वाढवून द्यावी', अशी विनंती राहुल गांधी यांनी शक्तिकांत दास यांना केली आहे.


'केरळमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूरामुळे शेतातील पिकांचे प्रंचड नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना डिसेंबर 2019 पर्यंत कर्ज भरण्याची मुदत वाढवून द्यावी', अशी विनंती राहुल गांधी यांनी पत्राद्वारे शक्तिकांता दास यांना केली आहे.


राहुल गांधी यांनी मतदारक्षेत्र वायनाडला भेट दिली आहे. वायनाडला पुराचा सर्वात जास्त फटका बसला आहे. राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करुन वायनाडमधील लोकांना मदत करण्याची विनंती केली होती. तर पूरग्रस्त भागांमध्ये जाऊन गरजू लोकांची मदत करा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते.


केरळमधील पुरामध्ये आत्तापर्यंत 102 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 59 जण बेपत्ता आहेत. ८०८ घरे उद्ध्वस्त झाली असून ८ हजार ४५९ घरांचे नुकसान झाले आहे. पुरामुळे 2 लाख 53 हजार नागरिकांना विस्थापीत करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details