नवी दिल्ली - काश्मीर प्रश्नावर मध्यस्थीबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानावरुन सध्या देशातील राजकीय वर्तुळात मोठा गोंधळ सुरु आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधानांनी देशाला खरे काय ते सांगावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. मंगळवारी लोकसभेतही विरोधकांनी यावरुन गोंधळ घातला. तसेच, पंतप्रधानांच्या स्पष्टीकरणाची मागणी करत ते सभागृहाबाहेर पडले.
काश्मीरप्रश्नी ट्रम्पना मध्यस्थीची विनंती केली होती का? मोदींनी देशाला खरे सांगावे - राहुल गांधी
'काश्मीरचा प्रश्न हा केवळ भारत-पाकिस्तान या 2 देशांमधील मुद्दा आहे, यावर आम्ही ठाम आहोत. यासंबंधीच्या सर्व समस्या भारत-पाकिस्तान मिळून सोडवतील. आम्ही शिमला-लाहोर करारानुसारच पुढे जाऊ. काश्मीर मुद्द्यावर तोडगा हा द्विपक्षीयच असू शकतो. त्यात तिसऱ्याने येण्याची गरज नाही. पाकिस्तानने सीमेपलीकडून दहशतवाद भारतात निर्यात करण्याचे थांबवल्यानंतरच हे शक्य आहे,' असे आज संसदेत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले.
'काश्मीर प्रश्नी भारत-पाकिस्तानमध्ये मध्यस्थीसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला विनंती केली होती, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केला आहे. जर हे खरे असेल तर मोदींनी भारताचे हितसंबंध आणि शिमला कराराची फसवणूक केली आहे. यावर परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण देऊन उपयोग नाही. तर खुद्द पंतप्रधानांनीच देशाला सांगायला हवे की, ट्रम्प आणि त्यांच्यात काय चर्चा झाली. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी आपले ट्विट मोदींना नव्हे तर ट्रम्प यांना टॅग केले आहे,' असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.