शुजलपूर - लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अखेरचे दोन टप्पे पार पडणे बाकी आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात माझ्याबद्दल, माझ्या वडिलांबद्दल, माझ्या आजीबद्दल प्रचंड द्वेष आणि तिरस्कार आहे. त्यामुळे ते आमच्यावर टीका करत आणि द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, मला त्यांच्या मनातून हा द्वेष संपवायचा आहे. म्हणून मी त्यांना झप्पी देतो. त्यांची गळाभेट घेतो,' असे राहुल गांधी यांनी आज मध्यप्रदेशातील शुजालपूर येथील प्रचारसभेत म्हटले.
मी, माझे वडील आणि माझ्या आजी-आजोबांबद्दल मोदींच्या मनात द्वेष - राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात माझ्याविषयी, माझे वडील राजीव गांधी यांच्याविषयी माझी आजी इंदिरा गांधी यांच्याविषयी प्रचंड द्वेष आणि तिरस्कार आहे. मला हा तिरस्कार त्यांच्या मनातून कायमचा संपवायचा आहे. म्हणूनच मी त्यांना झप्पी दिली, असे राहुल यांनी खोचकपणे म्हटले आहे.
मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वासदर्शक ठरावाच्या वेळी राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना अचानकपणे आलिंगन दिले होते. मात्र, मोदी जागचे हललेही नव्हते. या प्रकाराची चांगलीच चर्चा झाली होती. दरम्यान, मोदींनी राजीव गांधी यांच्यावर पहिल्या क्रमांकाचे भ्रष्टाचारी म्हणून टीका केली होती. तसेच, १९८४ च्या शीख विरोधी दंगलीचे आदेश त्यावेळी पंतप्रधान कार्यालयातून आले होते असा आरोप त्यांनी केला होता. याच सगळ्या आरोपांना राहुल गांधी यांनी मध्यप्रदेशातल्या शुजलपूर या ठिकाणी झालेल्या सभेत उत्तर दिले आहे.